नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज करोनाचा उद्रेक झाला. आज एकूण १३३० रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने नाशिककरांची चिंता आणखीनच वाढली आहे. तर एकूण ६ करोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर ५४९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे...

आज वाढ झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात 768, नाशिक ग्रामीणमध्ये 387, मालेगाव मनपामध्ये 138 तर जिल्हा बाह्य 37 रुग्णांचा समावेश आहे.

आजच्या सहा रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील करोना मृतांचा आकडा 2155 वर पोहोचला आहे. आजच्या मृतांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील 01, नाशिक ग्रामीणमधील 03 तर जिल्हाबाह्य 02 रुग्णांचा समावेश आहे.