दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत १३२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत १३२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाला. आतापर्यंत १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात ७३१५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यापैकी ७१३३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे...

सध्या तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत असले तरी अजूनही घरी उपचार ४८ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. १ रुग्ण बोपेगाव कोविड सेंटरमध्ये तर १ रुग्ण नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात आजही ५० रुग्ण उपचार घेत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटत असले तरी सौम्य लक्षणे असणारे लोक घरीच औषधोपचार घेत आहे. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग थांबताना दिसत नाही.

दुसऱ्या लाटेमुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंब निराधार झाले आहे. अजूनही ग्रामीण भागात रुग्ण आढळत असल्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सध्या दिंडोरी तालुक्यात १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण चालू झाले आहे. जनतेने प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लस घ्यावी. कोरोनाचा धोका आजही कायम असल्याने घरा बाहेर पडताना लोकांनी मास्क व सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

डॉ. सुजित कोशिंरे, वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com