नाशिक- पेठ महामार्गावरील अपघातात १३ जखमी

नाशिक- पेठ महामार्गावरील अपघातात १३ जखमी

पेठ । प्रतिनिधी

पेठ- नाशिक - महामार्गावरील बोरवठफाटा ते देवगावफाटा दरम्यान पेठकडून नाशिककडे जाणारी महाजे ता . दिडोरी येथील क्रुझर क्र . MH15 , CT 7870 रस्त्यालगत पलटी झाली. या वाह्नामधील १३ प्रवासी जखमी झाले.

क्रुझर वाहनामध्ये मध्ये १३ प्रवाशी खाजगी कामानिमीत्त पेठला आले होते . काम आटोपून गावाकडे परतत असताना त्यातील कमलाकर चौधरी वय ३३ रा . चिलारपाडा, रमेश दळवी वय ३८, यमुना दळवी १८ , सुमन दळवी ३० , चंदूलाल दळवी २८, लक्ष्मण दळवी ६८, देवराम खांडवी ६९ , मोहन खांडवी ६५, विठ्ठल गायकवाड ५२ , एकनाथ दळवी ४८ , एकनाथ दळवी ४२ सर्व राहणार चिलारपाडा ता. दिडोरी व भगवान राऊत वय ३२ रा . कवडासर व ड्रायव्हर अशोक सखाराम डंबाळे वय ३६ रा . महाजे जखमी झाले. जखमीना पेठ ग्रामीण रुग्णालयात प्रार्थमिक उपचार करण्यात आले .

या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरु आहे या अपघाताच्या पूर्वीच दोन दिवस अगोदरच सावळघाटात वजनदार वस्तू भरलेला ट्रक क्र.Gj15 AT6209 ह्या ट्रकचा देखील अपघात झाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com