जिल्हा परिषदेच्या १३ पशुधन पर्यवेक्षकांना पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या १३ पशुधन पर्यवेक्षकांना पदोन्नती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पशुसंवर्धन विभागातील (Animal husbandry Department) पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) या संवर्गातून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी (Assistant Livestock Development Officer) या पदावर १३ सेवकांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नतीदरम्यान समुपदेशनासाठी (Counseling) महिला व अपंग सेवकांना प्राधान्य देण्यात आले…

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी ही पदोन्नती दिली. यावेळी जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी विष्णुपंत गर्जे, पशुधन विकास अधिकारी अबोली साताळकर, सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, वृषाली पाठक, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, कनिष्ठ सहायक प्रितीलता सोनवणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व सेवक उपस्थित होते.

समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या सेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.