आज १२७ करोनामुक्त; सध्या 'इतके' रुग्ण उपचाराखाली

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून करोनाने (Corona) पुन्हा आपले डोके वाढले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे...

प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासात ९३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या एकूण ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात आज ४१ रुग्ण आढळले आहेत. तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात ५१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. '

करोना
अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

मालेगाव (Malegaon) मनपा क्षेत्रात ०१ रुग्ण आढळला असून आज जिल्हाबाह्य रुग्णाची नोंद नाही. १२७ रुग्णांनी करोनावर (Corona) मात केली आहे. आज एकही मृत्यू झाला नसून जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

करोना
नाशकात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार

दरम्यान, जिल्ह्यात करोना रुग्ण (Corona Patients) वाढत आहे. करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com