सिन्नर : कारच्या धडकेत बालक ठार
नाशिक

सिन्नर : कारच्या धडकेत बालक ठार

अपघातानंतर चालक कारसह फरार

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर-नाशिक महामार्गावरील सरदवाडी बायपासजवळ ओम्नी कारने सायकलला धडक दिल्याने १२ वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना आज (दि.५) दुपारी ३.३० च्या दरम्यान घडली.

सरदवाडी रस्त्यावरील महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा अथर्व श्रीकांत देशपांडे हा आपल्या २-३ मित्रांसह सायकल घेऊन सरदवाडीकडे फिरायला गेला होता. तिकडून परत येत असताना पुलाजवळील परफेक्ट अकॅडमीजवळ संगमनेरकडून सर्व्हिसरोडने खाली उतरणाऱ्या ओम्नी कारने सायकलला जोरदार धडक दिली. त्यात अथर्व गंभीर जखमी झाला त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अपघात होताच ओम्नी कार चालक कारसह फरार झाला. ही कार सिन्नर शहरातील असल्याचे समजते. मयत अथर्व हा आयडीबीआय बँकेतील अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा मुलगा असून येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये तो सातवीत शिकत होता.

सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. पोलीस हवालदार परदेशी, टिळे सदर ओम्नी कार चालकाचा शोध घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com