नांदूरशिंगोटे येथील बारा वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

नांदूरशिंगोटे येथील बारा वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

नांदूरशिंगोटे | Nandurshingote

नांदूरशिंगोटे (Nandurashingote) शिवारातील शेळके वस्ती वर बारा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने (Snake bite) मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

आर्यन शेळके (Aryan Shelke) असे त्याचे नाव आहे. नांदूरशिंगोटे- शिवारात योगेश शेळके यांची वस्ती असून शेतात भुईमूग शेंगा काढण्याचे काम सुरू होते. आर्यन (१२) हासुद्धा तेथे मदत करीत होता. भुईमुगाच्या शेंगा झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागद आणण्यासाठी तो गेला असताना, कागदा खाली असलेल्या सर्पाने त्याच्या पायाला दंश केला.

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने त्यास उपचारार्थ दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आर्यनच्या आकस्मित मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतांमध्ये विषारी सर्प आढळत असल्याने शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत आर्यन हा शिक्षक प्रिय विद्यार्थी होता. त्यास कराटे खेळाची प्रचंड आवड असल्याने इयत्ता तिसरीत असताना त्याने कराटे चे प्रशिक्षण घेतले होते. नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची निवड झाली होती, मात्र करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे त्याचे जाणे रखडले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com