
येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील रस्ते सुरेगाव (Suregaon) येथे मधमाशांचे मोहोळ (Bee swarm) काढण्याचा मोह अंगलट येऊन एका १२ वर्षीय बालकाचा ४० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत ( well) पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...
अधिक माहिती अशी की, काल (दि.२६) रोजी दुपारच्या सुमारास विहिरी जवळील मधमाशांचे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गजानन चव्हाण (१२) (Rishikesh Gajanan Chavan) हा बालक गेला होता. त्यावेळी मधमाशांचे मोहोळ काढत असतांना त्याच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने सैरावैरा पळत असताना अचानक विहिरीच्या कठड्यावरून पाय घसरल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर दुपारी दोन वाजेपासून खेळायला गेलेला ऋषिकेश घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता घराशेजारील विहिरीत ऋषिकेश पडला असावा असा संशय आला. यानंतर पाच ट्रॅक्टरच्या मोटरपंप साह्याने विहिरीतील पाणी (Water) बाहेर काढण्यात आले.
तसेच लगेचच येवला शहर व परिसरातील पोहोणाऱ्यांना बोलविण्यात येऊन शोध घेतला असता विहिरीच्या तळाशी ऋषिकेशचा मृतदेह (Body)आढळून आला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.