12 हजार 752 विद्यार्थ्याना आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून पुरवणी पदवी प्रदान

12 हजार 752 विद्यार्थ्याना आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून पुरवणी पदवी प्रदान
आरोग्य विज्ञान विद्यापीठ

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे सुमारे 12 हजार 752 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचा पुरवणी स्वरुपातील दीक्षांत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत साजरा करण्यात आला. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी अभिनंदन केले आहे...

विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांतास मा. कुलपती तथा मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सन 2019 च्या हिवाळी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व इंटर्नशिप पूर्ण केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्रदान करण्यात आली आहे

विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदानाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत किंवा मिनी कॉन्व्होकेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्यात येते.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांत उपक्रमात हिवाळी-2020 सत्रातातील उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे 1705 विद्यार्थ्यांना तसेच पदवी अभ्यासक्रमाचे हिवाळी-1019 व तत्सम विद्याशाखेचे उन्हाळी-2020 सत्रातील 11,047 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. सदर पदवी प्रमाणपत्र संलग्नित महाविद्यालयाकडे टपालाव्दारे सुपूर्द करण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे संपर्क साधून पदवी प्रमाणपत्र प्राप्त करावीत असे त्यांनी सांगितले.

हिवाळी-2019 सत्रातील पदवी अभ्यासक्रमातील वैद्यकीय विद्याशाखेचे 4252, दंत विद्याशाखेचे 493, आयुर्वेद विद्याशाखेचे 2551, युनानी विद्याशाखेचे 250, होमिओपॅथी विद्याशाखेचे 2055, बेसिक नर्सिंगचे 543, पोस्ट बेसिक नर्सिंगचे 142, ऑडिओलॉसजी अँड स्पीच लॅंग्वेज पॅथोलॉजी (BASLP) चे 07, तत्सम विद्याशाखेचे उन्हाळी-2020 सत्रातील बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (BOTH) चे 67, बॅचलर ऑफ फिजीओथेरपी (B.P.Th) चे 662, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स (BPO) चे 25 तसेच हिवाळी-2020 सत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील वैद्यकीय विद्याशाखेचे 102, मास्टर ऑफ डेन्टल सर्जरी (MDS) चे 07, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नालॉजी अभ्यासक्रमाचे 69, व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील तत्सम व नर्सिंग विद्याशाखेचे 244, आर्युेवेद व होमिओपॅथी विद्याशाखेचे 1283 विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, मा. प्राधिकरण सदस्य, विद्यापीठातील अधिकारी, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. त्यांना भावी वाटचालीकरीता विद्यापीठ परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com