‘करोना योद्धे’ लढताहेत बारा तास

‘करोना योद्धे’ लढताहेत बारा तास

जनतेसाठी प्रबोधन; संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात करोना रुग्ण संख्या वाढत असली तरी अधिकारी मात्र खेचुन न जाता तेवढ्याच जोमाने काम करताना दिसत आहेत.

दिंडोरीचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरीचे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांच्यासह आशा तब्बल बारा तास काम करताना दिसत आहेत.

लॉकडाऊनचा काळ तसा सर्वांनाच त्रासदायक होता. आजही निम्मे व्यावसायिक विक्रीसाठी बाहेर तर निम्मे घरात बसले आहेत.

दिवसागणित रुग्ण संख्या वाढत आहे. तत्काळ त्यावर नियंत्रणे मिळवणे अवघड होत चालले आहे. गेल्या चार पाच महिन्यांचा आढावा घेतला तर बर्‍यापैकी महसुल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग या सर्वांची धावपळ झाली.

अनेक हात रात्रं-दिवस राबत आहेत, परंतु दिंंडोरी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे आणि मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी बारा तासांपेक्षा जास्त काम करुन एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

दिंडोरी तालुक्यात पहिला करोनाचा रुग्ण सापडल्यापासून ते आजपर्यंत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी अतिशय तत्परेने परिस्थिती हाताळली आहे.

कोणत्या ठिकाणी रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करुन त्यांच्यासाठी स्वॅब यंत्रणा राबविली. घरातील व्यक्तींना विश्‍वासात घेऊन क्‍वॉरंटाईन करण्यासाठी प्रयत्न केला.

समुपदेशनाने रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेतली. अगदी रात्रीजरी एखाद्या रुग्णाचा अहवाल आला तरी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन क्षेत्र प्रतिबंधित करण्याचे काम त्यांनी केले. आरोग्य सेवकांना विश्‍वासात घेऊन त्यांनी सर्वेक्षण करुन घेतले व जनजागृती मोठ्या प्रमाणात केली.

एका युवकाला नैराष्यपोटी आत्महत्येचे विचार येत होते. त्याचे सुध्दा समुपदेशन डॉ.कोशिरे यांनी केले त्याला मानसिक आधार दिला.

दुसरीकडे दिंडोरीचे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांंनीही स्वत:च रणागंणात उतरुन दिंडोरी शहरात नियमांची कडक अंमलबजावणी केली. सेवकांना बरोबर घेऊन स्वत: प्रत्येक प्रभागात गेले.

परिसर निर्जतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकांनाही सुचना दिल्या. नियम न पाळणार्‍यांना प्रथमत: प्रेमाने समजून सांगितले. नंतर वेळ प्रसंगी कठोर कारवाई केली. किराणा व्यापार्‍यांनी सुध्दा डॉ.पाटील यांच्याशी चर्चा करुन तंबाखु जन्य पदार्थांची होळी केली.

सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 10-10 वाजेपर्यंत मुख्याधिकारी व दिंडोरी नगरपंचायतीचे सेवक फिरत राहिले. नगरपंचायतीच्या क्षेत्रात कडक अंमलबजावणी केल्याने करोनाचा संसर्ग टळला. बाजाराचे नियोजन केले.

याकामी प्रांत, तहसिलदार, नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांचेही सहकार्य लाभले. प्रशासकीय यंत्रणा राबवताना दोघेही अधिकार्‍यांनी जनसंपर्क दांडगा ठेवला. त्यामुळेच ते ‘करोना योद्धा’ ठरले आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com