नाशिक | Nashik

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरू केलेले ऑनलाइन वर्ग दिवाळीपूर्वी बंद पडले होते.

मात्र आता बंद पडलेले हे ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. करोना पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. अशात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेेतर्फे ऑनलाइन वर्ग २ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले होते.

पण विद्यार्थ्यांना पूर्व सूचना न देता १० नोव्हेंबरला हे वर्ग अचानकपणे बंद करण्यात आले होते. आता शिक्षण विभागाने अचानक बंद केलेले अकरावीचे हे ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू केले आहेत. यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइवच्या माध्यमातून) सहाय्याने तासिका घेण्यात येत आहेत.

ऑनलाईन वर्गांचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होत आहे. सद्यस्थितीमध्ये सरकारमार्फत इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून स्थगित असलेली अकरावी प्रवेशाची प्रक्रिया देखील पुन्हा सुरू झाली आहे.

या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि घरी राहून विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यादृष्टीने हे ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. अकरावीच्या तिन्ही विद्याशाखांच्या तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक हे एससीईआरटीच्या "https://covid19.scertmaha.ac.in/eleventh " या लिंकवर पाहता येणार आहेत.