ठरलं! 'या' तारखेला होणार अकरावीची सीईटी

उद्यापासून भरता येणार अर्ज
ठरलं! 'या' तारखेला होणार अकरावीची सीईटी

नाशिक | Nashik

प्रथमच अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी (11th Admission CET) ची प्रतीक्षा संपली असून २१ ऑगस्ट रोजी ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे.

राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख (Exam Date) अखेर आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांना २० जुलै (उद्या) सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) भरता येणार आहेत.

राज्यात काही दिवस अगोदरच इयत्ता दहावीचा निकाल (10th Result) जाहीर झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वी ची सीईटी द्यावी लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com