अकरावी सीईटीची वेबसाईट 'शटडाऊन'
अकरावी प्रवेश

अकरावी सीईटीची वेबसाईट 'शटडाऊन'

नाशिक | Nashik

अकरावी सीईटी नोंदणीसाठी (11th Admission CET) राज्य मंडळाने सुरू केलेली वेबसाइट दोन दिवसांपासून तांत्रिक समस्यांमध्ये (Website Shutdown) अडकल्याने, ती तात्पुरत्या स्वरुपात बंद (Website Closed) ठेवण्यात आली आहे.

वेबसाइट सुरू झाल्यानंतर अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे (Maharashtra State Board) जाहीर केले आहे.

दहावीच्या निकालाच्या (10th Result) दिवशी संकेतस्थळ ठप्प झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी उद्भवत होत्या. निकालाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ कार्यान्वित होऊ शकले नव्हते. त्याचप्रमाणे अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी २० ते २६ जुलै अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, नोंदणी सुरू झाल्यापासूनच विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत.

मंगळवारी दिवसभरात एक लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणींचा(Technical Issues) सामना करीत अर्ज भरले.

बुधवारी सकाळापासूनच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट बंद असल्याचा संदेश नोंदणीदरम्यान मिळत होता.

दुपारी चारनंतर ही समस्या दूर झाल्यानंतर सकाळी नोंदणीचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी झाल्याचा संदेश मिळाल्याचेही अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व पाश्वभूमीवर राज्य मंडळाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ही वेबसाइट तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती राज्य मंडळाकडे असल्याने, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळाने सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी पुरेसा वेळही दिला जाणार आहे.

अर्जाची मुदत वाढवावी लागणार...

यापूर्वी जारी सूचनापत्रानुसार येत्या सोमवार (ता. २६) पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र लिंक बंद असल्याने आता अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करावी लागणार आहे. अन्यथा अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com