जल जीवन अभियानात निफाडच्या 119 गावांचा समावेश

पाणीपुरवठामंत्र्यांकडे आ. बनकरांच्या शिफारशीने योजनांना मंजुरी
जल जीवन अभियानात निफाडच्या 119 गावांचा समावेश

निफाड । प्रतिनिधी Niphad

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Minister for Water Supply and Sanitation- Gulabrao Patil )यांचे दालनात व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पाणीपुरवठा (water supply) योजनांना मंजुरी देण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत निफाड तालुक्यातील लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेसह 119 गावांचा समावेश करण्यात आल्याचे आ. दिलीप बनकर यांनी म्हटले आहे.

सन 2024 पर्यंत प्रति मानसी 55 लिटरप्रमाणे प्रतिदिन शुद्ध, स्वच्छ व शाश्वत पाणी मिळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. यात ग्रामीण भागातील सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच गावांच्या सार्वजनिक नवीन पाणीपुरवठा योजना यात टँकरने पाणीपुरवठा होणारी गावे (water supply by tankers) आदींचा प्राधान्याने समावेश करणे. त्याचप्रमाणे ज्या गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. तसेच ज्या योजनांचा कालावधी संपुष्टात आला आहे.

तसेच पाणी गुणवत्ता बाधित गावे, संसद आदर्श ग्राम योजना, अवर्षणग्रस्त भागातील गावे तसेच अनुसूचित जाती जमाती बहूल लोकसंख्येची गावे आदी गावातील नवीन योजना हाती घेणे, रेट्रोफिटिंग अ- पूर्वी दरडोई दररोज 45 लिटरप्रमाणे पाणीपुरवठा योजना होत्या. त्यात आता वाढ करण्यात येवून अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज 55 लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत किंवा ज्या गावांमध्ये पंपिंग तास वाढवून किंवा पंपिंग मशिनरीमध्ये किरकोळ सुधारणा करून तसेच वाढीव वितरण वाहिन्या आवश्यक असल्यास त्याचा समावेश करून दरडोई दररोज 55 लिटर पाणी देणे शक्य आहे

अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळजोडण्या देणे या कामांचा समावेश सुधारणात्मक पुर्नजोडणी रेट्रोफिटिंग अ अंतर्गत या योजना घेणे. रेट्रोफिटिंग ब मध्ये अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज 55 लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम नाहीत, अशा ठिकाणी रेट्रोफिटिंग अ व्यतिरिक्त किंवा नमूद केलेल्या कामापेक्षा अधिक कामे उदारणार्थ स्त्रोत विकास, नवीन स्रोताचा शोध, ऊर्ध्व / गुरुत्व वाहिन्या, पाण्याची टाकी बांधणे इत्यादी आवश्यकतेनुसार त्यांचा समावेश करून दरडोई दररोज 55 लिटर पाणी देणे शक्य आहे, अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळजोडणी देणे या कामांचा समावेश सुधारणात्मक पुर्नजोडणी रेट्रोफिटिंग ब या अंतर्गत घेण्यात यावा. यानुसार वर्गीकरण करण्यात आलेले असून जे गाव वरील वर्गवारीत समाविष्ट आहे त्या नुसार योजना मंजूर होणार आहे.

यानुसार तिन्ही वर्गवारीनुसार तालुक्यातील एकूण 119 गावांचा व लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा समितीने त्या-त्या तालुक्यातील सादर केलेल्या आराखड्यातील गावांना पाणीपुरवठा राबविण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com