म्हसरूळ पोलिसांकडून ११६ रॅपिड टेस्ट

यात १५ पॉझिटिव्ह
म्हसरूळ पोलिसांकडून ११६ रॅपिड टेस्ट

पंचवटी | Panchavti

शहरासह परिसरात नागरिक संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत असल्याने यावर आळा बसण्यासाठी म्हसरूळ पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून सोमवार (ता.१९ ) रोजी २२ जणांवर कारवाई केली असून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच अनावश्यक फिरणाऱ्या ११६ नागरिकांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.विशेष केलेल्या अँटिजेन चाचण्या मध्ये म्हसरूळ भाजी मंडई तील पाच भाजी विक्रेते हे पॉझिटिव्ह आले आहेत.

करोनाचे वाढते संक्रमण पाहता राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे.

यात म्हसरूळ भाजी मंडई परिसर विनामास्क फिरणारे, सामायिक अंतर न पाळणे, विनाकारण रस्त्यावर भटकणे अश्या सुमारे २२ नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

म्हसरूळ , आडगाव ,पंचवटी परिसर दिंडोरी रोड, पेठरोड , औरंगाबाद रोड आदी परिसरात अनावश्यक फिरणाऱ्या व म्हसरूळ भाजी मंडई त असलेल्या काही भाजी विक्रेते यांची अश्या सुमारे ११६ नागरिकांची विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात १५ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्याना अँबुलन्सने दिंडोरी रोडवरील मेरी वसाहत मधील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com