जिल्ह्यासाठी ११०० होमगार्ड उपलब्ध

लॉकडाऊनमध्ये पोलीसांचा ताण होणार कमी
जिल्ह्यासाठी ११०० होमगार्ड उपलब्ध

नाशिक । Nashik

कोरोना लॉकडाऊन काळात पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पोलीस दलात मणुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने होमगार्डची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने जिल्ह्यासाठी 1 हजार 100 होमगार्ड उपलब्ध केले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांच्या सोबतीला आता होमगार्डचे जवानही तैनात झाले आहेत. त्यानुसार शहरात 500 पुरुष व 100 महिला तसेच ग्रामीण भागात 500 पुरुष होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

21 मे ते 30 जून या कालावधीत होमगार्ड बंदोबस्त करणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यात पोलिसांची भुमीका महत्वाची आहे. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन घेण्यासाठी पोलीस यंत्रणा 24 तास बंदोबस्त करीत आहे. मात्र यात पोलीसही कोरोनाबाधित होत असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

त्यामुळे बंदोबस्तासाठी 40 दिवस त्यांच्या जोडीला होमगार्डचे जवान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारी म्हणून बंदोबस्तासाठी 50 वर्षापुढील होमगार्डच्या जवानांना नियुक्ती दिलेली नाही. तर जिल्ह्यात 1 हजार 100 होमगार्ड मिळाले आहेत. 21 मेपासून ते पोलिसांसोबत बंदोबस्त करीत असून 30 जूनपर्यंत बंदोबस्तात तैनात राहणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काहीसा हलका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com