उपनगरला ११ वाहनांची तोडफोड

टोळक्याचे दशहत माजवत कृत्य
उपनगरला ११ वाहनांची तोडफोड

नाशिक | nashik (प्रतिनिधी)

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेबाराच्या मोटरसायकलवर आलेल्या टवाळखोरांनी परिरात दांडके नाचवत आरडाओरड, शिवीगाळ करून दहशत पसरवत ११ चार चाकी वाहनांची तोडफोड केली. या भागात टवाळखोरांचा उपद्रव वाढत असून ते पोलीसांनाच आव्हान देत असल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी हॉटेल चालक जफर तौसिद खान (२९, गुलमोहर पार्क, डीजीपीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ते २३ नोव्हेबरला रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास आजारी सासरे लतिफ पठाण (रा.बरकत विला फ्रेन्डसकॉलनी, इच्छामणी लॉन्स मागे, उपनगर) यांना भेटून घरी परत असताना सासरांच्या घरासमोर दोन जण आरडाओरड करत भरधाव वेगात मोटरसायकलवर (एमएच १५ सीआर ५४७४) जात होते. त्यांनी खान यांची बलेनो गाडी (एमएच १५ जीएक्स ०८११) थांबवली.

दुचाकी चालकाने हातात दंडुका घेऊन बलेनोची काच फोडली. सासरे लतिफ पठाण यांच्या कारची (एमएच १५ बीएन ५२३३) काच फोडली. दहशत माजवत ते पुढे गेले. खान त्यांच्यामागे गेले असता रस्त्यावर लोकांची गर्दी होती. हल्लेखोरांनी परिसरातील चार चाकी वाहनांचेही अशाच पध्दतीने नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

नुकसान करण्यात आलेली वाहने अशी

स्टॅन्ट्रो कार (एमएच १५ बीएक्स ४७३९), झेन (एमएच १५ डीसी ६९६३) , मारुती व्हॅन (एमएच १५ बीएक्स २८८२), इको स्पोर्ट (एमएच १५ जीएफ ७४६०, आणि एमएच १५ डीसी २५१९), स्वीफ्ट डिझायर (एमएच १५ एफएफ ४९१५), बलेनो (एमएच १५ बीएक्स २७३६ आणि एमएच १५ जीएक्स ०८११) मारुती इर्टिगा (एमएच ०३ सीएस ५६३१), व्हॅगनर (एमएच १२ एएन १३३२ आणि एमएच १५ बीएन ५२३३).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com