
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या (Corona Patients) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात १०६ नवे करोनाबाधित रुग्ण (Corona Patients) आढळले आहेत...
सध्या एकूण ५८१ रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ५४ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात ४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज ०२ रुग्ण आढळले आहेत तर ०१ जिल्हाबाह्य रुग्णांची नोंद आज करण्यात आली आहे. आज करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आज १०८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.