जिल्ह्यात आढळले १०५ करोना पॉझिटिव्ह

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या (Corona Patients) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दिवसभरात १०५ नवे करोना (Corona) रुग्ण आढळले आहेत...

सध्या एकूण ६१० रुग्ण करोनावर (Corona) उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात नाशिक मनपा (Nashik NMC) क्षेत्रात ४७ रुग्ण तर नाशिक ग्रामीण (Nashik Rural) क्षेत्रात ५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

करोना
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

मालेगाव (Malegaon) क्षेत्रात आज एकही नवा रूग्ण आढळला नसून एक जिल्हाबाह्य रुग्ण नोंद आज करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासात करोनाने (Corona) एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com