दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत १०१ रुग्णांचा करोनाने मृत्यू; ५८५ घेत आहेत उपचार

दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत १०१ रुग्णांचा करोनाने मृत्यू; ५८५ घेत आहेत उपचार

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात करोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी होता दिसत असले तरी काल तालुक्यात एकाच दिवशी ठिकाणी- ठिकाणी ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यात अजून करोना संसर्गाने आपले पाळेमुळे घट्ट रोवलेले दिसून येत आहेत...

करोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून खेड्यामध्येही करोनाने थैमान घातले आहे. अनेक जेष्ठ नागरिक करोनाच्या धास्तीने मृत्यू पावले.

दिंडोरी तालुक्यात आतापर्यत ६८५५ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर त्यातील ६१५९ करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी करोनावर केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

विविध ठिकाण्याच्या खाजगी व सरकारी दवाखाने , खाजगी व सरकारी कोव्हिड सेंटर तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळामध्ये स्थापन करण्यात आलेले विलगीकरण कक्ष व घराच्या घरामध्ये ५०६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यत दिंडोरी तालुक्यात करोना विषाणूच्या संसर्गाने १०१ लोकांचा बळी घेतला आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही करोना विषाणूचा संसर्ग थांबलेला नाही. करोनाचे सौम्य लक्षणे असणारे तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने घराच्या घरी उपचार घेतना दिसत आहे.

दिंडोरी पासून नाशिक शहराचे अंतर खूपच कमी आहे. अनेक नागरिकांचे नाशिक शहरात रोजचे जाणे- येणे आहे. तसेच शेतक-यांचा मार्केटशी रोजचा संबध यामुळे तालुकयाच्या ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यातील जनतेने अजूनहि खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे काल दिंडोरी तालुक्यात ४७ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे त्यामुळे अजून तरी तालुक्यात पाहिजे तशा प्रमाणात रुग्ण संख्या घटलेली नाही.तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी खूप काळजी घेणे गरजेचे असून कुणीही कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच सुरक्षित अंतर , मास्क ,सॅनिटायझर याचा वापर करावा. तसेच भाजीपाल घेवून जाणारे शेतकरी , किराणा दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी.

सुजित कोशिंर, तालुका वैद्यकीय अधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com