नाशिक | Nashik

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील बससेवेवरही परिणाम झाला आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्यांमध्ये ७० टक्के घट झाली असून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध कठोर निर्बध लागू केले आहे. एसटीतून आसनक्षमतेच्या प्रमाणात प्रवाशांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

नाशिक विभागातून करोनापूर्वी सुमारे साडेसहाशे बसेस सोडण्यात येत होत्या. आता केवळ चारशे गाड्या रस्त्यावर धावत आहे.

एसटी दररोज सव्वादोन लाख किलोमीटर धावत असल्याने सुमारे ६० लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता एसटी केवळ दीड लाख किलोमीटर धावत असून, सरासरी ३४ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

दरम्यान, बाजारपेठांसह खासगी आस्थापना बंद तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मर्यादात्यातच आणि नागरिकही घराबाहेर पडत नाही.

कराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बससेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. मंगळवारी (दि. ६) सायंकाळपर्यंत नाशिकमध्ये सुमारे १०० फेऱ्या एसटी महामंडळाने रद्द केल्या.