जिल्हा रूग्णालयात बालकांसाठी 100 बेडचा कक्ष

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची सज्जता
जिल्हा रूग्णालयात बालकांसाठी 100 बेडचा कक्ष

नाशिक । Nashik

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बालके अधिक बाधित होण्याची शक्यता व्यक्तींज होत असल्याने यापार्श्वभूमीवर सज्जतेसाठी जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र 100 खाटांच्या स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे.

तिसर्‍या लाटेत दहा वर्षांवरील मुले अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच तिसर्‍या मजल्यावर या 100 खाटांच्या कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

या कक्षात भिंतींवर आकर्षक कार्टुन आणि चित्रे काढून कक्ष सजविण्यात आला आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजन लाईनची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. आठवडाभरात या कक्षात आवश्यक असणार्‍या व्हेंटिलेटर्ससह अन्य यंत्रणा व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय महानगर पालिकेच्या वतीनेदेखील शहरात 100 खाटांची दोन रुग्णालये केवळ बालके आणि त्यांच्यामातांसाठी सज्ज करण्यात येण आहेत.

जिल्ह्यातील तीन ग्रामी रुग्णालयांमध्ये 50 आणि उपजिल रुग्णालयांमध्ये बालकांसाठी स्वतं 25 खाटांचे नियोजनदेखील करण्या आले आहे. त्या सर्व बेडची पूर्तत आणि तिथेदेखील ऑक्सिजनलाईनच सज्जता ठेवण्यात येणार आहे. दुसर्‍या लाटेवेळी झालेली ऑक्सिजन अपूर्ततेची उणीव निदान तिसर्‍या लाटेत जाणवणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील खासगी स्वरुपाच्या 46 बाल रुग्णालयांमध्ये एकूण 600 अधिक बेडची पूर्तता ठेवण्यात आली आहे. त्यात 400 हून अधिक ऑक्सिजन बेड, 25 व्हेंटिलेटर बेड आणि अन्य बेडची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये मिळून आवश्यकता भासल्यास केवळ बालकांसाठी किमान एक हजारहून अधिक बेड उपलब्ध होणार आहेत.

Related Stories

No stories found.