
इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यात मंगळवार व बुधवार सलग दोन दिवस तीन ठिकाणी वेगवेगळे अपघात (Accident) घडले असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू (Death) तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार (दि.११) रोजी सकाळी वैतरणा धरणाजवळ (Vaitrana Dam) मजुरांना (laborers) घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक उलटल्याने १० मजूर जखमी (injury) झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळ कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने त्याठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष मजुरांना हा ट्रॅक्टर घेऊन जात होता. त्यावेळी हा अपघात घडला.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरील स्थानिकांनी जखमी मजुरांना मदत करत पुढील उपचारासाठी वैतरणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) दाखल केले.