जिल्ह्याला १ हजार अम्फोटेरेसीन बी. इंजेक्शनची गरज, मिळाले तीनशे

जिल्ह्याला १ हजार अम्फोटेरेसीन बी. इंजेक्शनची गरज, मिळाले तीनशे
USER

नाशिक । Nashik

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसचे २५९ रुग्ण उपचार घेत आहे. या आजारावर उपचारासाठी महत्वपूर्ण असलेले अॅम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन जिल्ह्याला सोमवारी फक्त ३०० उपलब्ध झाले. दिवसाला हजार इंजेक्शनची गरज असताना फक्त अडिचशे ते तीनशे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली आहे.

पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार बळावत आहे. मागील पाच दिवसांपुर्वी रुग्णांचा आकडा १५० वरुन आता २५९ इतका झाला आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रणासाठी जिल्ह्यात आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजनही सुरु झाले आहे. त्यासाठी आता स्वतंत्र तीन अधिकाऱ्यांचीही विविध स्तरावर नियुक्ती करत जबाबादारी सोपविण्यात आली आहे.

नाशिक शहरामध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर इंजेक्शन पुरवठा नियंत्रित आणि समन्यायी पध्दतीने वाटपाचे काम सोपविले आहे. तर ग्रामीण भागात जिल्हा शल्य चिकित्सकांवर आणि मालेगाव शहरात मालेगाव मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांवर हे काम सोपविले आहे.

शनिवारी नाशिक शहरात २०९ रुग्णांसाठी २३४ इंजेक्शन झाले उपलब्ध झाले होते. तर, सोमवारीही हजारावर इंजेक्शनची अपेक्षा असताना अवघे १०५ इतकेच इंजेक्शन जिल्ह्यास उपलब्ध झाले आहेत.

त्यातील ९४ नाशिक शहरातासाठी मनपाला देण्यात आले तर उर्वरित ११ इजेक्शन जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांसाठी ठेवण्यात आले आहे त्यामुळे आता या अपुऱ्या इंजेक्शनमध्ये कसे भागणार अशी चिंता आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेलाच पडली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com