नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असले तरी करोना रुग्णसंख्येत भर पडत असून सोमवारी (दि. १५) १ हजार ३७६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. थोडिफार दिलासादायक बाब म्हणजे ५५१ रुग्ण करोना मुक्त झाले.

करोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. विकऐण्डला बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मात्र तरी देखील करोना रुग्ण संख्येत रोज भरच पडत असून सलग पाचव्या दिवशी करोना पाॅझिटिव्ह रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला.

सोमवारी सर्वाधिक रुग्ण ७८८ हे महापालिका हद्दित आढळले. तर ग्रामीण हद्दित ४०७ रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले. तर मालेगाव मनपा हद्दित १४९ तर उर्वरीत जिल्ह्यात ३२ करोना बाधित आढळले.

तर दिवसभरात सहा रुग्णांचा करोनाने बळी घेतला. दरम्यान, प्रशासनाकडून करोना रुग्णांचा वाढता आलेख कमी व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.