वर्गमित्राच्या कुटुंबाला ०१ लाख ११ हजाराची मदत

मित्रांचा मित्रासाठी असाही आदर्श !
वर्गमित्राच्या कुटुंबाला ०१ लाख ११ हजाराची मदत

कळवण | Kalwan

आपल्याला सोडून गेलेल्या वर्ग मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी वर्गमित्र सरसावले अन त्यांनी जवळपास एक लाख अकरा हजार रुपये मित्राला मदतीच्या स्वरूपात दिली आहे. वर्गमित्रांच्या या कृतीतून त्यांनी एकजुटीची व माणुसकीची शिकवण दिली आहे.

वाखारी येथील रहिवासी, येवला येथील बँकेत नोकरीस असलेल्या शैलेंद्र गोसावी आणि त्यांचे मोठे बंधू दीपक गोसावी या दोन्ही भावांचे करोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ते असलेले शैलेंद्र गोसावी व दीपक गोसावी अचानक सोडून गेल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला.

अशा बिकट परिस्थितीत आपल्या मृत वर्गमित्राच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी या हेतूने देवळा येथील शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स सन 1991बॅचच्या वर्गमित्रांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, अशी पोस्ट आमनी देवळानी शाळा या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल होताच क्षणार्धात त्याला कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील वर्गमित्रांनी प्रतिसाद दिला.

या सर्व प्रक्रियेत वर्गमित्रांनी पुढाकार घेत तसेच त्यांना 1991 च्या बारावी सायन्स बॅचचे वर्गमित्र यथाशक्ती मदत करीत असून चांगला प्रतिसाद देत आहेत.

शैलेंद्र गोसावी हे उपचार घेत असताना वर्गमित्र प्रकाश भामरे यांनी उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे वर्गमित्रांना सांगितले. तसेच याबाबतचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करुन मदतीचे आवाहन केले होते.

त्यानंतर मदत जमा व्हायला सुरवात झाली. परंतु आर्थिक मदतीपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत जमा झालेली एक लाख अकरा हजारच्या आसपास रक्कम त्याच्या कुटुंबियांला आर्थिक मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com