सिन्नरच्या लेकींचा हरियाणात डंका

सिन्नरच्या लेकींचा हरियाणात डंका

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील 9 तर निफाडच्या (niphad) 1 मुलीने राज्याचे प्रतिनिधित्व करत हरियाणात (Haryana) झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत (national kho-kho competition) सर्व राज्यांच्या संघांना पिछाडत सुवर्ण पदक प्राप्त केले.

विशेष म्हणजे या संघात तालुक्यातील ठाणगाव (thangaon) येथील 7 मुलींचा व बारागाव पिंप्रीच्या (Baragaon Pimpri) दोन मुलींचा समावेश होता. नुकतेच माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्या हस्ते या सर्व मुलींचा गौरव करण्यात आला.

स्टुंडट ऑलिम्पिंक असोसिएशनकडून (Student Olympic Association) देशभरात घेण्यात आलेल्या या स्पर्धेेची सुरुवात तालुकास्तरावर झाली. शहरातील सिल्वर लोटल स्कूलवर (Silver Lotal School) घेण्यात आलेल्या तालुकास्तरावरील स्पर्धेत ठाणगावच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर तालुक्यातील सर्व संघातील मुलींमधून उत्कृष्ठ 11 जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेेसाठी निवड करण्यात आली. नाशिक (nashik) येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर (Chhatrapati Shivaji Stadium) घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सिन्नर (sinnar) संघाने निफाड (niphad) संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.

यानंतर जिल्ह्यातील उत्कृष्ठ 11 खेळांडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सोलापूर (solapur) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा संघाने नांदेड जिल्ह्याच्या (nanded district) संघाला पिछाडत प्रथम क्रमांक पटकावला. याच संघाची हरियाणातील रोहतक येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. विशेष: म्हणजे या संघात सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) ठाणगाव येथील 7 मुली, सिन्नर शहरातील 1, बारागाव पिंप्री येथील 2 मुलीचा समावेश होता.

तर उर्वरित 1 मुलगी निफाड तालुक्यातील होती. नुकत्याच हरियाणात पार पडलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सिन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या संघाने उपांत्य फेरीत हरियाणाच्याच संघावर 8 च्या फरकाने मात करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या मुलींवर सर्वच स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या खेळाडूंचा समावेश

तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत गवसणी घालून सुवर्णपदक पटकावणार्‍या या संघात ठाणगाव येथील अर्चना श्रीकृष्ण गुंड, सोनाली शिंदे, मोनिका शिंदे, संजना शिंदे, ज्योती आगविले, रोहिणी शिंदे, स्वाती शिंदे यांचा समावेश होता. बारागाव पिंप्री येथील रेणुका उगले व पूजा जाधव या मुलींचा समावेश होता. या संघात निफाड येथील मिझबा मुलाणीचा समावेश होता.

राजाभाऊंकडून शाबासकीची थाप

तालुक्याचे नाव राज्य, देशपातळीवर उंचावणार्‍या मुला-मुलींचा माजी आ. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नेहमीच गौरव करण्यात येत असतो. तालुक्याच्या या मुलींनी राज्याचे प्रतिनिधित्व करत हरियाणात जात सुवर्ण पदक पटकावणे ही गौरवास्पद बाब असल्याचे राजाभाऊं यावेळी म्हणाले. त्यांनी या मुलींना आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलावत त्यांचा गौरव करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

Related Stories

No stories found.