
पंचवटी । प्रतिनिधी | Panchavati
सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी (students) अभ्यासाबरोबरच संगणक शिक्षण (Computer Education) घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन एथॉस रिसॉर्ट अँड वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विद्याधर पावनस्कर (Vidyadhar Pawanskar, Director, Ethos Resort and Ventures Pvt) यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या (Nashik Education Society) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) वेळुंजे येथील आश्रम शाळेतील पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी विद्याधर पावनस्कर बोलत होते. पावनस्कर व पावनस्कर यांनी सांगितले की, नाशिक एज्युकेशन सोसायटीने त्रंबकेश्वर तालुक्यातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी (students) आश्रम शाळा सुरू करून उत्तम प्रकारे ज्ञानदानाची व्यवस्था केली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी वारली चित्रकला प्रशिक्षण घेऊन कलाक्षेत्रात निपुण व्हावे, उत्तम यश संपादन करावे असे देखील सांगितले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पावनस्कर, कार्यवाह राजेंद्र निकम, शिवसेनेचे युवा नेते समाधान बोडके, प्रगतिशील शेतकरी नवनाथ बोडके, ज्येष्ठ नेते विष्णुपंत बोडके व वेळुंजे गावच्या सरपंच राधिका उघडे व्यासपीठावर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय श्यामकांत बोरसे यांनी केला. यावेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा (students) गौरव करण्यात आला. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन अर्चना जनबंधू व अनिल चांदवडे यांनी केले. शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक गोपाळ उघडे यांनी सादर केला. विद्याधर वसंत पावनस्कर यांनी एथास रिसॉर्ट अँड वेंचर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत संस्थेस व शाळेस पंचवीस हजार रुपयाची देणगी या वेळेस दिली.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मिलिंद घटकर यांनी आभार मानले. यावेळी पंढरीनाथ बागुल, नयना अहिरे, विक्रम बार्हे, मच्छिंद्र बोडके शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.