
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जुनी पेन्शन (Old Pension) सुरू करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कर्मचाऱ्यांनी (Govt, Semi Govt employees) सोमवारी (दि.२०) सकाळी आपापल्या कार्यालयासमोर काळे वस्त्र परिधान करत थाळीनाद आंदोलन (agitation) केले.
जुनी पेन्शन (Old Pension) मिळावी, या मागणीसाठी महसूल विभाग (Department of Revenue), जिल्हा परिषद (zilha parishad), आदिवासी विकास विभाग (Department of Tribal Development), आरोग्य विभाग (Department of Health), बांधकाम विभाग (Construction Department), जिल्हा रुग्णालय (District Hospital), शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यासह विविध संवर्गातील कर्मचारी मंगळवार (दि.१४) पासून बेमुदत संपावर (indefinite strike) होते. संपाच्या सातव्या दिवशी सोमवारी दुपारी जुनी पेन्शनचे मागणी राज्य सरकारकडून पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करत थाळीनाद आंदोलन (agitation) केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या थाळीनाद आंदोलनामध्ये नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष तुषार नागरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघाचे सरचिटणीस व नाशिक तालुका संघ व सहसचिव रविंद्र पवार,नाशिक जिल्हा लेखा व कोषागारे गट क कर्मचारी संघटना मुबंई शाखा- नाशिक अध्यक्ष संदीप पवार,
महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे गट क कर्मचारी संघटना मुबंई प्रमुख कार्यवाह (सरचिटणीस) राजेश राजवाडे, मध्यवर्ती संघटना चतुर्थश्रेणी नाशिक जिल्हाध्यक्ष महसूल चतुर्थ श्रेणी नाशिक ज्ञानेश्वर कासार, राज्य कर्मचारी महसूल संघटना नाशिक उपाध्यक्ष अर्चना देवरे, विभागीय महिला अध्यक्ष कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सारीखा सोनवणे, वाहन चालक महसूल संघटना, नाशिक अध्यक्ष राजेंद्र पाबळे आदी सहभागी झाले होते.