बकरी ईद
बकरी ईद
नाशिक

प्रशासनाला सहकार्य करून ईद साजरी करा

खतीब ए नाशिक यांचे आवाहन; पोलीस आयुक्तालयात झाली विशेष बैठक

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | Old Nashik

शनिवारी (दि.1 ) मुस्लिम समाज ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा मोठा सण साजरा करणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्वप्रकारच्या सामुदायिक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे मशिदींमध्ये तसेच ईदगाह मैदानावर यंदा ईदची सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम होणार नाही तरी मुस्लिम बांधवांनी शांततेत, धार्मिक पद्धतीने व प्रशासनाला सहकार्य करून ईदचा सण साजरा करावा, असे आवाहन खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.

ईदच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पोलिस आयुक्तालयात पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी व मुस्लिम धर्मगुरूंची बैठक झाली. यावेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सण साजरी करण्यावर एकमत झाले.

मुस्लिम बांधवांनी घरात नमाज पठण करून कायद्याने दिलेल्या चौकटीत कुर्बानी व इतर धार्मिक विधी कराव्यात, आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात यावी, कुर्बानीचा प्रसाद वाटप करताना कायद्याचे पालन करावे तसेच करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कोणीही ही कुठेही गर्दी करू नये.

असे आवाहन करण्यात आले. दरम्यान शहर परिसरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये देखील मागील काही दिवसांपासून मुस्लिम धर्मगुरू व पोलिसांच्या समन्वय बैठका सुरू असून यामध्ये देखील घरीच नमाज पठण करण्यावर एकमत झाले आहेत.

रमजान महिन्यानंतर रमजान ईदचा मोठा सण देखील मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून साजरी केला होता तर बकरी ईदचा सण देखील मुस्लिम बांधव घरीच नमाज पठण करून कुर्बानी देऊन साजरी करणार आहे.

दरम्यान, मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी पूर्ण केली असून शहर परिसरात कुर्बानीसाठी जनावरे आणण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जनावरे विक्रीसाठी देखील उपलब्ध झाले आहेत. दरम्यान आज मुस्लिम बांधवांनी घरी गोड पदार्थ तयार करून अरफे  सणानिमित्त फातेहा पठाण करून त्याचे प्रसाद वाटप केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com