पूरचार्‍यांचे जाळे निर्माण करा: आ कोकाटे

सिंचन, जलसंधारण व भूजल सर्वेक्षण विभागाची बैठक
पूरचार्‍यांचे जाळे निर्माण करा: आ कोकाटे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

पूर कालव्यांचे बळकटीकरण करावे त्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पूर्ण दाबाने पाणी (water) मिळेल, उपचार्‍या चालू करून त्याद्वारे शिवारात पाणी फिरल्यास जमिनीत पाणी मुरून त्या त्या भागाची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

पूर्ण तालुक्यात पूर चार्‍यांचे जाळे निर्माण असल्यास वाहून जाणार्‍या पाण्याचे व येणार्‍या नदी जोड प्रकल्पाच्या (river linking project) पाण्याचे उत्तमरित्या वितरण करणे सोपे जाईल, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी दिल्या. भूजल सर्वेक्षण विभागात (Ground Water Survey Division) सिंचन (irrigation), जलसंधारण (water conservation) व भूजल सर्वेक्षण विभाग या तिन्ही विभागांची आमदार कोकाटे यांनी संयुक्त बैठकीत अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी सिंचन विभाग कार्यकारी अधिकारी सागर शिंदे (Irrigation Department Executive Officer Sagar Shinde), उपअभियंता नारायण डावरे, जलसंधारणचे कार्यकारी अधिकारी हरिभाऊ गीते, समन्वयक अविनाश लोखंडे, भूजल सर्वेक्षणचे कार्यकारी अधिकारी जे. एस. बेडवाल, उपअभियंता व्ही. डी. पाटील आदी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण विभागाने तालुक्यात 94 कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात बोअरवेल मारणे, नाला खोलीकरण, अस्तारीकरण, बंधार्‍यांची डागडुजी अशा स्वरुपाची कामे धरली आहे.

त्यावर आमदार कोकाटे यांनी नाराजी व्यक्त करत योजना राबवायची म्हणून राबवू नका, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास (study of geographical conditions) करा, योग्य उपचार करुन पाणीसाठा वाढविण्यासंदर्भात तीन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सिंचन, जलसंधारण व भूजल विभागांनी एकत्रित समन्वय साधून सिन्नर तालुक्यातील सर्वच गावांचा सर्वे करून नदीचे वाहून जाणारे पूरपाणी शक्य तिथे पाटचारीने किंवा बंधिस्त पाईपलाइनद्वारे कमी पावसाचे प्रमाण असणार्‍या भागात फिरवावे. जेणेकरून तालुक्यातील सर्व गावांची पाणी पातळी वाढून शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल, असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

आराखडा तयार करून शासनास पाठवा’

केंद्र शासनाची भूजल विभागामार्फत अटल भूजल योजना कार्यान्वीत असून त्या योजनेत सिन्नरचा समवेश असून त्या योजनेचा उदेश सुद्धा जमिनीतील पाणी पातळी वाढविणे हाच आहे. आपण सर्व विभागांनी मिळून किमान हजार पंधराशेर कोटी रुपयांचा दर्जेदार आणि उत्कृष्ट मॉडेल ठरेल असा आराखडा तयार करून तत्काळ शासनास पाठवावा अशा सूचना आमदार कोकाटे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com