पती-पत्नीचे भांडण विकोपाला; ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून

पती-पत्नीचे भांडण विकोपाला; ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashik Road

पती-पत्नीच्या झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना नाशिक रोड (Nashik Road) येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवन च्या लॉज (Lodge) मध्ये घडला असून याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक (Arrested) केली आहे.

अटक केलेल्या पतीचे नाव पोपट वीर असे असून कोपरगाव (Kopargaon) येथे राहणार आहे आपली दुसरी पत्नी ज्योती तिच्यासोबत तो मंगळवारी नाशिक (Nashik) शहरात आल्यानंतर बिटको चौकातील हॉटेल पवन लॉजमध्ये त्याने दोन रूम घेतले हे का रूम मध्ये त्याच्या मुलांना झोपवले तर दुसऱ्या रूम मध्ये ते दोघे थांबले रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघांचे कडाक्याचे भांडण झाले.

या भांडणाचे पर्यावसान खुनात झाले पोपटने पत्नी ज्योती वीर हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून (Murder) केला दरम्यान ही घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोपट वीर यास ताब्यात घेतले दरम्यान याप्रकरणी पोपट वीर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोपट यास दोन बायका आहे ज्योती ही त्याची दुसरी पत्नी होती.

Related Stories

No stories found.