देशदूत इम्पॅक्ट: दिंडोरी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील : झिरवाळ

देशदूत इम्पॅक्ट: दिंडोरी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील : झिरवाळ

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी (dindori) ग्रामीण रुग्णालयातील (rural hospital) तक्रारी ओघ कधी कमी होणार याबाबत दैनिक देशदूतने (deshdoot) वृत्त प्रसिध्द करताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांनी दखल घेवून

दिंडोरी रुग्णालयातील (Dindori Hospital) कारभार सुधारण्याबरोबरच येथील सोयीसुविधा वाढण्यासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा (Sub-District Hospital) दर्जा मिळण्याचा प्रलंबित असलेला प्रस्ताव लवकरच पुर्णत्वास येईल, असे आश्वासन देशदूतशी बोलतांना दिले.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात विशेषत: गरोदर मातांचे उपेक्षा होते, याबाबत दैनिक देशदूतने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. तसेच दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सोयी अपुर्‍या पडतात. याविषयी वारंवार तक्रारी येत होत्या. जबाबदारी झटकण्याचा प्रकार दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) होत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. यावर दैनिक देशदूतने सविस्तर वृत्त प्रसिध्द करुन जनसामान्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहचवला.

त्याची दखल संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दखल घेवून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील (Dindori Rural Hospital) त्रुटी दूर करण्याबाबत आश्वासन दिले. लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करुन जास्तीत जास्त सेवा जनतेला येथेच मिळतील, याबाबत आवश्यक त्या कायदेशीर मार्ग पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी दिले.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील सोयीसुविधा वाढण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माझ्याकडून आवश्यक ते प्रयत्न मीही करेल. राज्य शासनाच्या अंतर्गत हा विषय येत असल्यामुळे संबंधित मंत्री महोदयांशी देखील याबाबत चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील तक्रारी कमी होतील, यासाठी आम्ही प्रयत्न करु.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पुरेपूर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जबाबदारी झटकण्याचा प्रकार आम्ही करणार नाही तर आलेल्या रुग्णांना पुरेपूर सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाबाबत ज्या काही तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारींची दखल घेत यावर नक्कीच तोडगा काढून पुन्हा अशा तक्रारी उद्भवणार नाही, याची आम्ही काळजी घेवू.

- डॉ. समीर काळे, प्रभारी अधिक्षक, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर व्हावे, जेणेकरुन तालुक्यातील जनतेला आरोग्यांच्या सुविधा मुबलक मिळण्यासाठी मदत होईल. त्या दृष्ठरने ना. नरहरी झिरवाळांकडे आमचा पाठपुरावा असून लवकरच त्यात यशस्वी होवू, याची आम्हाला खात्री आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी रुग्णालयातील तक्रारींबाबत चर्चा केली असून यापुढे अशा तक्रारी येणार नाही, यासाठी मी स्वत: लक्ष देईल.

- निर्मला मवाळ, आरोग्य सभापती, दिंडोरी

Related Stories

No stories found.