तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सिन्नर तालुक्यातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : शहरातील देशमुख नगर परिसरातील अश्वीनाथबाबा चौकात वास्तव्यास असलेल्या तरुणाने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि 21 सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

शुभम सुनील वहाणे (१९) असे या तरुणाचे नाव असून तो सिन्नर महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. देशमुख नगरमधील आश्वीनाथबाबा चौकातील रो-हाऊसमध्ये तो आईसह राहत होता. त्याची आई माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला आहे.

रविवारी सकाळी आई कामावर गेल्यानंतर शुभम घरी एकटाच होता. त्याने घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरुम मधील पंख्याला साडीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. बेडरुम मधील खिडकी उघडी असल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेजारील कुटूंबियांना शुभमने गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यांनी तातडीने नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. नगरसेवक पावसे यांनी लागलीच सिन्नर पोलीस ठाण्यात कळविले.सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंख्याला लटकलेला शुभमचा मृतदेह खाली उतरवुन घेत शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला.

दरम्यान, शुभमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ न शकल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सिन्नर पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com