ढगफुटीसदृश्य पावसाने बांधांना तडे

ढगफुटीसदृश्य पावसाने बांधांना तडे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील वडगाव-सिन्नर (sinnar) येथे ढगफुटीसदृश्य पाऊस (heavy rain) होऊन अनेक शेतकर्‍यांच्या (farmers) शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने परिसरातील अनेक शेतकर्‍याच्या शेताचे बांध फुटल्याने (farm dam burst) मोठे नुकसान झाले आहे.

गुरुवारी (दि.23) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जयप्रकाशनगर (कंदोरी) व वडगाव-सिन्नर, कोनांबे, डुबेरे येथे मुसळधार पाऊस झाला. या परिसरात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून बांध फुटले. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली. पावसाच्या पाण्याने ओढे-नाले एक झाले. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले.

या पावसाने वडगाव-सिन्नर शिवारातील रवींद्र कडभाने यांच्या शेत गट नंबर 503 व चंद्रभान सदाशिव कडभाने यांच्या गट नंबर 504 या क्षेत्रात मोठे नुकसान झाले. रवींद्र कडभाने यांच्या क्षेत्रातून सुमारे 25 गुंठे भागातील माती वाहून गेली. त्याचबरोबर चंद्रभान कडभाने यांच्या क्षेत्रातीलही माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्यांच्यापुढे आता शेती कसा करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडगाव सिन्नरच्या तलाठी पाटील व कृषीसेवक भगत यांनी पंचनामा केला आहे. या शेतकार्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com