डॉ. राज नगरकर यांना 'इन्स्पायरिंग अँकॉलॉजीस्ट ऑफ इंडिया' पुरस्कार
नाशिक

डॉ. राज नगरकर यांना 'इन्स्पायरिंग अँकॉलॉजीस्ट ऑफ इंडिया' पुरस्कार

Dinesh Sonawane

सातपूर | प्रतिनिधी

नाशिकच्या एचसीजी मानवता केअर कँन्सर हॉस्पिटलच्या संचालक कर्करोग तज्ञ डॉ.राज नगरकर यांना इकॉनॉमिक्स टाईम्स संस्थेतर्फे देण्यात येणारा मानाचा "इन्स्पायरिंग अँकॉलॉजीस्ट ऑफ इंडिया" हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने देऊन गौरविण्यात आले.

केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या सेवेमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. नाशिक येथील एचसीजी मानवता केअर कँन्सर हॉस्पिटलमध्ये केवळ उत्तर महाराष्ट्र अथवा महाराष्ट्र राज्यात नव्हे तर परदेशातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी नाशिकमध्ये दाखल होत असतात त्यांच्या या रुग्णसेवेची नोंद घेत इकोनॉमिक्स टाइम्स संस्थेतर्फे मानाचा "इन्स्पायरिंग अँकॉलॉजीस्ट ऑफ इंडिया" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

या पुरस्काराबद्दल बोलताना डॉ. राज नगरकर म्हणाले की, हे यश केवळ माझा एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे योगदान याच्यासाठी कारणीभूत आहे. कॅन्सरने त्रस्त झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सर्व टिम कायम प्रयत्नशील असते.

भारत हे विविध संसाधनांनी भरलेला देश आहे याठिकाणी आणि तंत्रज्ञान अथवा संशोधनाचा भाग येत नसून केवळ बदल घडवण्याची उर्मी मनात दाटलेली असल्याचे डॉ. राज नगरकर यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com