जिल्ह्यात शिक्षक संवाद सेतू कार्यक्रम

जिल्ह्यात शिक्षक संवाद सेतू कार्यक्रम

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी निर्देशीत केल्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक संवाद सेतू कार्यक्रम ( Shikshak Samvad Setu Campaign ) पार पडणार आहे.

नाशिकचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण ( Nashik Deputy Director of Education Dr. B.B. Chavan) समस्याग्रस्त शिक्षकांसाठी शिक्षक संवाद सेतू कार्यक्रम आयोजित करणार आहे. यातून शिक्षकांच्या समस्या सोडवणे हा एक उद्देश आहे.

शिक्षण विभाग सध्या विविध कारणांनी महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. म्हणून नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये समस्याग्रस्त शिक्षकांसाठी शिक्षक संवाद सेतू कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तारखा शिक्षण उपसंचालक विविध जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकार्‍यांना कळवणार असून शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्या हा त्या मागचा उद्देश आहे.

शिवाय ज्या शिक्षकांची समस्या आहे त्याच शिक्षकांना या कार्यक्रमात प्रवेश मिळणार आहे. विविध संघटनांचे शिक्षक नेते अथवा कार्यकर्ते यांनी शिक्षक संवाद सेतू मध्ये भाग घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. यासाठी समस्याग्रस्त शिक्षकांनी आपले म्हणणे लेखी अथवा तोंडी या कार्यक्रमात मांडावयाचे आहे. यासंदर्भात लवकरच नाशिक धुळे जळगाव नंदुरबार च्या शिक्षण अधिकार्‍यांना कळवले जाणार असून शिक्षकांनी आपल्या कामात संबंधित कागदपत्रे अथवा अर्ज तयार करावे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आम्ही नाशिक विभागात येणार्‍या चार जिल्ह्यांमध्ये घेणार आहोत. यामध्ये केवळ समस्याग्रस्त शिक्षकांनीच उपस्थित राहावयाचे आहे. विविध संघटनांचे शिक्षक नेते अथवा प्रतिनिधी यांना सहभाग घेता येणार नाही. ज्या शिक्षकांची अडचण आहे त्यांना लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

डॉ.बी.बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com