कै.पांडुरंग चुंभळे यांच्या पुण्यतिथी निमित्त कुस्त्यांच्या स्पर्धा
USER

कै.पांडुरंग चुंभळे यांच्या पुण्यतिथी निमित्त कुस्त्यांच्या स्पर्धा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

कै.पांडुरंग सखाराम चुंभळे (Late Pandurang Sakharam Chumbhale) यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त गौळाणे गाव (Gaulane village) येथे दुपारी 3 ते सायं ८ वाजेपर्यंत कुस्त्यांची भव्य दंगलीचे (Wrestling riots) आयोजन विस्तारक युवासेना महाराष्ट्र तथा सरपंच गौळाणे नाशिक (Nashik) अजिंक्य चुंभळे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

यावेळी उदघाटक म्हणून युवासेना सचिव वरून सरदेसाई (Sardesai from Yuvasena Secretary) तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे (Former Chairman of Agricultural Produce Market Committee Shivaji Chumbhale), सिने दिग्दर्शक तथा अभिनेते प्रवीण तरडे (Cine director and actor Praveen Tarde),सर सेनापती हांबिरराव मोहिते चित्रपटाची पूर्ण टीम तसेच युवासेना पदाधिकारी, नाशिक शहर व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र केसरी-हर्षद सदगीर (Maharashtra Kesari-Harshad Sadgir) विरुद्ध भारत केसरी-सिकंदर शेख यांच्यात लढत होणार असून विजेत्यास २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबतच उप महाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे विरुद्ध माउली जमदाडे यांच्यात लढत होणार असून विजेत्यास १लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक,

महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके (Maharashtra Champion Balu Bodke) विरुद्ध केवल भिंगारे यांच्यात लढत होणार असून विजेत्यास ७५,००० हजार रुपयांचे पारितोषिक, महाराष्ट्र चॅम्पियन-विजय सुरुडे विरुद्ध समीर शेख यांच्यात लढत होणार असून विजेत्यास ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबतच आखाड्यात इतरही कुस्त्यांचे आयोजन होणार असून इच्छुक पहिलवानांनी या सामन्यांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन अजिंक्य चुंभळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com