कादवा बॉयलर अग्नीप्रदीपन

कादवा प्रगतीस सहकार्य करावे : झिरवाळ
कादवा बॉयलर अग्नीप्रदीपन

ओझे । वार्ताहर Ozhe

‘कादवाची (kadva) 1250 मेंटन गाळप क्षमता दुप्पट झाली ऊस (suger cane) उत्पादकांना उत्तर महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक भाव मिळत आहे. नव्याने इथेनॉल प्रकल्प (ethanol project) साकारत असून कादवाने राज्यात नावलौकिक मिळवला असून कादवाचे प्रगतीस सर्वांनी सहकार्य करावे’, असे आवाहन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे (kadva co-operative sugar factories) 45 वे बॉयलर अग्निप्रदीपन (boiler ignition) विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे (shreiram shete) होते. बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सौ. व श्री. बाळासाहेब विठ्ठल देशमुख, सौ. व श्री. मधुकर टोपे यांच्या हस्ते झाले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कारखान्याची सध्य स्थितीची सविस्तर माहिती देत साखरेला अपेक्षित भाव व उचल होत नसल्याने साखर उद्योग अडचणीत असतानाही कादवाने एफआरपी अदा केली आहे. इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी प्रत्येक सभासदाने 5 हजार का होईना ठेव ठेवावी त्यास कारखाना 10 टक्के व्याज देईल. एक वेळ कादवाला कुणी ऊस देत नव्हते.

आता जिल्ह्यातील ऊस उत्पादक (sugarcane growers) कादवाला प्रथम पसंती देत आहे. संस्थेचा हितासाठी नाविलाजास्तव बाहेरून ऊस आणावा लागला. यावर्षी ऊसतोडणी करताना कार्यक्षेत्राला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. विरोधक राजकीय स्वार्थासाठी विस्तारीकरणाला विरोध करत होते. आता इथेनॉल ला विरोध करत आहे पण अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

केवळ साखर निर्मितीवर कारखाने चालू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल ला प्रोत्साहन दिले आहे. कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. सीएनजी प्रकल्पसाठीही (CNG project) सरकारने 50 टक्के सबसिडी (Subsidy) देऊ केली आहे. संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस हे शाश्वत पीक असून सर्व शेतकरी (farmers) सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.

यावेळी बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील (Market Committee Chairman Dattatreya Patil), उपसभापती अनिल देशमुख (Deputy Speaker Anil Deshmukh), जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी संचालक संजय पडोळ, विठ्ठलराव संधान, युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे, विश्वासराव देशमुख यांनी विचार मांडले. यावेळी तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी शेवाळे, सदाशिव शेळके,

अमोल भालेराव, शिवाजीराव जाधव, अशोक वाघ, अशोक भालेराव, सुरेश कळमकर, रामभाऊ ढगे, वसंतराव कावळे, संजय कावळे, भास्कर भगरे, नरेश देशमुख, गुलाब जाधव, प्रमोद मूळाने, शाम हिरे, गंगाधर निखाडे, डॉ. योगेश गोसावी, शिवाजी जाधव, नवनाथ ठोंबरे, एस.के. पाटील आदींसह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कामगार, सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. आभार कार्यकारी संचालक हेंमत माने यांनी मानले.

Related Stories

No stories found.