ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करा : आयुक्त जाधव

ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करा : आयुक्त जाधव

नाशिक । प्रतिनिधी

रुग्णालयात उपलब्ध बेड संख्येनुसार आवश्यक असणारा ऑक्सिजन साठा व त्यासोबत अतिरिक्त दोन दिवस पुरेल एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन साठवण क्षमता राहील, असे नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

नाशिक महापालिका हद्दीतील 50 बेड क्षमतेपेक्षा जास्त क्षमता असलेल्या खासगी रुग्णालयांची बैठक मनपा मुख्यालयात घेण्यात आली. एप्रिल व मेमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी भविष्यात निर्माण होऊ नये यादृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने शहरातील ऑक्सिजन साठवण क्षमता व निर्मिती क्षमता वाढवण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. यानुसार बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या.

शासन निर्देशाप्रमाणे येणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येतील अशी शक्यता लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्ये यापेक्षा अजून किती अतिरिक्त खाटा राखीव करण्यात येतील याबाबत आढावा घेतला आहे. त्यानुसार रुग्णालयांनी पुढील आठ दिवसांत त्यांचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

त्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयांप्रमाणेच ऑक्सिजन साठवण क्षमता तातडीने वाढवणे व त्याबाबत नियोजन करणे व केलेले नियोजन नाशिक महापालिकेस कळवणे. या सर्वांमधून येणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये नाशिकमधील नागरिकांना पुरेशी व दर्जेदार ऑक्सिजन सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com