उच्च न्यायालयाचा थकबाकीदारांना दणका

जिल्हा बँकेतर्फे वाहन लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू होणार
उच्च न्यायालय
उच्च न्यायालय

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (Nashik District Central Cooperative Bank) करण्यात येत असलेल्या ट्रॅक्टर, वाहनाच्या लिलाव प्रक्रिया (Auction process) विरुद्ध थकबाकीदारांनी केलेल्या

याचिकेवरील स्थगिती उच्च न्यायालयाने (High Court) उठविली आहे. यामुळे जिल्हा बँकेतर्फे लवकरच लिलाव सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली. नाशिक बँकेने थकीत कर्जवसुली (Recovery of overdue debts) करिता धडक मोहीम चालू केली आहे. जिल्ह्यातील सन २०१५-१६ पूर्वीचे मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे

थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास आदेश दिले आहे. बँकेने थकीत कर्जवसुली करिता धडक मोहीम चालू केली आहे. जिल्हा बँकेची वाहन / ट्रॅक्टर कर्जाची मोठी थकबाकी झालेली आहे.

यामध्ये पेठ (peth) तालुक्यातील ३२ ट्रॅक्टर / वाहन जप्त केले होते. त्याप्रमाणे ३२ ट्रॅक्टर / वाहनाची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त करून दिनांक१६ एप्रिल २०२२ रोजी जाहीर लिलाव (public auction) ठेवण्यात आला होता. सदर लिलावा विरुद्ध काही थकबाकीदार सभासद हे उच्च न्यायालयात गेले असता त्यांना तात्पुरती स्थगीत न्यालायाने दिलेली होती.

न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनवण्यामध्ये बँकेने दिलेले कर्ज हे सदर मालमत्तेकरीता दिलेले असून सदर मालमत्तेचे मुल्याकन दिवसेदिवस हे कमी होत असून कर्जदाराचे व बँकेचेही नुकसान होत आहे. त्यामुळे जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टर / वाहनाची दिलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी दिलेली स्थगिती उठवून

सदर जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टर / वाहनाची लिलाव करण्यास दि. ३० मार्च २०२३ च्या आदेशान्वये परवानगी दिलेली आहे. या ३२ ट्रॅक्टर / वाहनाचा लिलाव लवकर करण्यात येणार आहे. जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com