बोरद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

बोरद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

बोरद - Borad वार्ताहर-

बोरद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून काल एक रेडकू फस्त केले तर दोन शेळ्यांना जखमी केले. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. शेळ्या, रेडकू, कुत्रे, डुक्कर आदी पाळीव प्राण्यांना बिबटया फस्त करत आहे. वनविभागाने या बटयाचा बंदांबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

तळोदा तालुक्यातील कळमसरे येथील विक्रम आमशा नाईक हे गुरुवारी रानावनात शेळीच्या कळपाला दिवसभर चारून घरी आणत असतांना बिबट्याने अचानक कळपावर हल्ला केला. त्यामुळे विक्रम यांनी आरडाओरड केल्याने, बिबट्या त्या शेळीला तेथेच सोडून पसार झाला. परंतु ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याने केव्हाही दगावण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी त्या भागातील वनपाल विरसिंग वळवी यांनी विचारपूस करत थातुरमातुर उपाययोजना करण्यात आल्या. त्यांनतर शुक्रवारी मध्यरात्री बोरद येथील प्रगतीशील शेतकरी नंदलाल काशीनाथ पाटील यांच्या शेतातील म्हशीच्या तबेल्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्यात दोन वर्षीय रेडकूचा फडशा पाडत, जागीच फस्त केल्याचे सांगण्यात आले.

बिबट्या याच परिवरात फिरत असल्याने परिसराती शेतकरी व मजुरवर्ग पूर्णपणे भयभीत झाला आहे. बोरद, मळी, धनपूर कळमसरे दरम्यान बिबट्याचा मूक्तसंचार दिवसेंदिवस वाढत आहे. याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com