महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सोमवारपासून जिल्हयात

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सोमवारपासून जिल्हयात

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत आहे.

समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि.5 सप्टेंबर 2021 रोजी रात्री शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे मुक्काम. 6 सप्टेंबर 2021 सकाळी 9.30 ते 10 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधीसमवेत अनौपचारिक चर्चा. 10 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांसमवेत चर्चा. 11 ते 11.45 वाजता समितीची अंतर्गत बैठक, विविध विभागांच्या प्रकल्प, कामे, योजना कार्यालयांना भेट, पाहणी व बैठकीसंदर्भात नियोजन करणे.

11.45 ते दुपारी 2 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग, नगरविकास विभाग (नगरपालिका, नगरपंचायत), ग्रामविकास विभाग ( जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायत) महसुल व वन (महसुल ) विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, विधी व न्याय विभाग, कौशल्य विभाग व उद्योजकता विभाग, सहकार विभाग, गृह विभाग व इतर विविध विभागांअतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना , प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी.

दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग, नगरविकास विभाग (नगरपालिका, नगरपंचायत), ग्रामविकास विभाग ( जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायत) महसूल व वन (महसूल ) विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, विधी व न्याय विभाग, कौशल्य विभाग व उद्योजकता विभाग, सहकार विभाग, गृह विभाग व इतर विविध विभागांअतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना , प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी. रात्री शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे मुक्काम.

7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग, नगरविकास विभाग (नगरपालिका, नगरपंचायत), ग्रामविकास विभाग ( जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायत) महसुल व वन (महसुल ) विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, विधी व न्याय विभाग, कौशल्य विभाग व उद्योजकता विभाग, सहकार विभाग, गृह विभाग व इतर विविध विभागांअतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना , प्रकल्प कार्यालये व कामांना भेट व पाहणी.

दुपारी 2 ते 3 वाजता राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता नंदुरबार जिल्ह्यातील संबंधीत विभागाचे प्रकल्प, कामे आणि कार्यालयांना दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबींच्या संदर्भात व लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधीत अधिकारी यांच्यासमवेत बैठक, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com