वादळी पाऊस : टेंभे येथे महिलेचा मृत्यू

वादळी पाऊस : टेंभे येथे महिलेचा मृत्यू

शहादा - Shahada - ता.प्र :

तालुक्यांत आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे झाड तुटून तालुक्यातील टेंभे येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील लोहारा, तिधारे, गोगापुर परिसरात २० ते २५ घरांचे छपरे उडून नुकसान झाले.

त्याचबरोबर विद्युत खांबही कोसळून तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तालुक्यातील टेंभे त.सा. येथे वाऱ्यामुळे झाडाची फांदी पडून बायजाबाई संजय ठाकरे (४५, रा. लोणखेडा) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान नुकसानीची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

तालुक्यात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासह कोसळल्या.

त्यात अनेकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. ग्रामीण भागातील बहुतांश घरांचे पत्रे वार्‍याच्या वेगाने उडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यातील नंदुरबार परिसरातही सायंकाळी तुरळक पाऊस झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com