डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेस मारहाण , आठ जणांविरुद्ध गुन्हा

डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेस मारहाण , आठ जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

डाकीण Witch असल्याच्या संशयावरुन महिलेस मारहाण Woman beaten करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरीचा टेंबरीगव्हाणपाडा (ता.अक्कलकुवा) येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल crime against eight करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंबरीगव्हाणपाडा (ता.अक्कलकुवा) येथील जिंगलीबाई खाअल्या वसावे हिचा दात दुखत होता.

ती आजारी पडल्याने तिचा खर्च सेविबाई दाजला वसावे टेंबरीगव्हाणपाडा (ता.अक्कलकुवा) हीने द्यावा कारण ती महिला डाकीण आहे, जादुटोणा करते असे समजून भरत पेचरा वसावे, खाअल्या दित्या वसावे, दिल्या इंद्या वसावे, रामा जतर्‍या वसावे, हिराबाई भरत वसावे, केमनाबाई दिल्या वसावे, जिंगलीबाई खाअल्या वसावे, शांतीबाई रामा वसावे सर्व रा. टेंबरीगव्हाणपाडा (ता.अक्कलकुवा) यांनी सेविबाईला हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

खर्च दिला नाही तर जिवेठार मारण्याची धमकी त्यांनी दिली. याबाबत सेविबाईने दिलेल्या फिर्यादीवरुन मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश शिंगणे करीत आहेत.

याप्रकरणी भरत पेचरा वसावे, खाअल्या दित्या वसावे, दिल्या इंद्या वसावे, रामा जतर्‍या वसावे यांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com