व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर वाईन शॉप सील, गुन्हा दाखल

भरत गावीत यांनी व्हीडीओ केला व्हायरल
व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर वाईन शॉप सील, गुन्हा दाखल

नवापूर । श.प्र. navapur

शहरातील एमडी वाईन शॉप शुक्रवारी दुपारी एक वाजेनंतर सुरू असल्याचा व्हिडिओ भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांनी व्हायरल केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, रजिस्टर आढळून न आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा वाईन शॉप सील करून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती निरीक्षक बी. बी. सूर्यवंशी यांनी दिली.

नवापूर शहरात रमजान ईद व अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गांधी पुतळ्याजवळील एमडी वाईन शॉप सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून भरत गावित यांनी थेट एमडी वाईन शॉपजवळ जाऊन वाईन शॉप उघडे असल्याचा दावा केला होता. त्या अनुषंगाने शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याने वाईन शॉपवर तपासणी केली असता तेथेे रजिस्टर आढळून न आल्याने व तसेच मद्यविक्री करीत असल्याचे दिसून आल्याने वाईन शॉप जिल्हाधिकार्‍यांचे पुढील आदेश येईपर्यंत सील केले आहे.

नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बी.बी सूर्यवंशी, शैलेंद्र मराठे, मनोज संबोधी, हितेश जेठे, हंसराज चौधरी, रामसिंग राजपुत, मानसिंग पाडवी यांनी ही कारवाई केली. याप्रसंगी नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी उपस्थित होते.

पार्सल देण्याची मुभा

एमडी वाईन शॉपचे संचालक बडोगे यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकार्‍याने वाईन शॉपला होम डिलिव्हरी सुविधा देण्याचे आदेश दिले आहे. सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार्सल देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक शटर बंद करून लहान शटर उघडे करून पार्सल देत होतो. त्या दरम्यान हा व्हिडिओ करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com