तलावडी येथे 100 वर्षीय आजीबाईंचे लसीकरण

तलावडी येथे 100 वर्षीय आजीबाईंचे लसीकरण

शहादा । ता.प्र

तालुक्यातील तलावडी (ता. शहादा) येथे 45 वर्षावरील व्यक्तींची लसीकरण मोहिम संपन्न झाली. त्यात एकूण 40 पुरुष व 34 स्त्रिया असे एकुण 74 लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यात विशेष म्हणजे 100 वर्षीय दितलीबाई रेहेंज्या पावरा यांनी लस घेऊन एक आदर्श निर्माण करुन दिला.

ग्रामीण भागात लस घेण्याबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. प्रशासकीय पातळीवरून जनजागृती सुरू आहे. मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.शाळा शिक्षक, अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना लसीकरणाबाबत वेळोवेळी जनजागृती केली.

तसेच गावात दोन वेळा स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यात एकूण 355 जणांची तपासणी केली. पैकी 57 व्यक्तींचे विलगीकरण कक्षात समायोजन केले. दोन व्यक्तींचा जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे मृत्यू झाला असून 55 व्यक्तींवर यशस्वी उपचार करण्यात आले.तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मणिलाल शेल्टे, डॉ.चंकी पराडके, डॉ.प्रफुल्ल धनगर, परिचारिका नीता नाईक, आशाबाई भिल, सुपरवायजर संजय दळवे, सरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, जि. प. शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, अनुदानित आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com