नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज दुपारी 3.30 वाजे दरम्यान अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली. या पावसामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात 22 मार्च 2021 पर्यंत विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती.

आज दि.20 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्यां सुमारास अचानक ढगाळ वातावरण झाले. काही मिनिटातच अवकाळी पाऊस झाला.

नंदुरबार शहरातह काही भागात तुरळक पाऊस झाला तर नवापूर चौफुलीकडे गारपीट झाली. तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर जास्त होता.

सुमारे 20 मिनिटापर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. रात्री उशिरापयर्ंंत ढगाळ वातावरण कायम होते.