शनिमांडळ परिसरात वीज पडून तरुणाचा मृत्यू

नंदुरबार जिल्हयात बेमोसमी पाऊस

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

तालुक्यातील शनिमांडळ फाटयाजवळील शेतात आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असून वादळीवार्‍यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता.

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास वीजांच्या कडाकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जिल्हयातील काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र, नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्टयात दुपारी 12 वाजेच्या सुमारास वीजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होता.

तालुक्यातील शनिमांडळ-रजाळे फाटयावर राजू भरवाड यांच्या शेतात शनिमांडळ, तिलाली येथील रविंद्र रामदास गिर (32) हा मजूरी करीत होता.

दरम्यान, त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच शनिमांडळ, तिलाली, रजाळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत युवकाच्या कुटूंबियांनी यावेळी एकच हंबरडा फोडला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com