तळोदा येथे भरधाव पिकअपच्या धडकेत दोन जण जायबंदी

हातगाडीसह सहा मोटरसायकलींना दिली ठोस
तळोदा येथे भरधाव पिकअपच्या धडकेत दोन जण जायबंदी

मोदलपाडा/ सोमावल ता. तळोदा वार्ताहर Modalpada / Somaval

तळोदा शहरातील भन्साली प्लाझा Bhansali Plaza परिसरात बेदकारपने पिकअपव्हॅन चालवुन चालकाने उभ्या असलेल्या हातगाडी मोटारसायकली, यांना धडक दिली.

या अपघातात दोन जण जायबंदी झाले आहे. घटना घडताच रस्त्यावरील पादचारींचीही एकच धावपळ उडाली होती. एका मोटर सायकलीला धडक दिल्याने मोटारसायकल तब्बल पाचशे मोटर घसरत नेऊन रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सदर वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पिकअप व्हॅन Pickup van (क्र. एम.एच.3, ए.डी.1366 ) वरील चालकाने तळोदा शहरातील गजबजलेल्या डी.पी. रस्त्यावरून बेदकारपने वाहन चालवत सुरुवातीला एका हातगाडीस जोरदार ठोस दिली. त्यानंतर तेथे जवळच उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकलीनाही ठोस दिली. एव्हढेच नव्हे तर एका मोटर सायकलला motorcycle फरफटत नेऊन सत्यम हॉटेल जवळ थांबली.

या अपघातात पादचारी अनिल रमेश भांडारकर (वय 37 ) मुस्तकीन शेख मोइद्दीन (वय 55) हे जबर जखमी झाले आहे. शिवाय सहा ते सात जणांना किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शनीनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी तळोदा शहराचा आठवडे बाजार होता.

ही घटना गजबजलेल्या भन्साली प्लाझा Bhansali Plaza परिसरात घडल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. दरम्यान पोलिसांना घटनेची खबर मिळाल्या बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, फौजदार अमितकुमार बागुल, हे. काँ.अजय कोळी, अजय पवार, विजय ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण घटनेची माहिती घेतली या प्रकरणी तळोदा पोलिसांत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जखमी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

या अपघातात जखमी झालेले पादचारी अनिल भांडारकर व मुस्किन शेख यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांना डोक्यास हाता पायास जबर मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

घटना समजताच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जितेंद्र सुर्यवंशी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, योगेश मराठे, भरत चौधरी, आनंद सोनार, संजय पटेल, जयेश सुर्यवंशी, अमनुद्दिन शेख, जितेंद्र दुबे, नगरसेवक रामानंद ठाकरे यांनी दवाखान्यात येऊन जखमींना मदत केली. तथापि बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून उभ्या असलेल्या हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग झोन हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरनिवर आला असून पोलिसांच्या दुर्लक्ष बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे या अतिक्रणावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com